Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

चार षटके, तीन निर्धाव, तीन बळी; दीप्ती शर्माचा अनोखा विक्रम

Share

सुरत : भारतीय महिला संघातील दीप्ती शर्माच्या नावावर अनोखा विक्रम नोंदवण्यात आला आहे. मंगळवारी (दि. २४) झालेल्या टी२० सामन्यात चार षटकांत ८ धावा देत तीन बळी टिपले आहेत. महत्वाचे म्हणजे या चार षटकात तीन षटके निर्धाव टाकली आहेत.

दरम्यान भारतीय महिला संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघात पाच सामन्याची मालिका आहे. यातील पहिला टी२० सामना सुरत येथे पार पडला. या सामन्यात भारतीय महिला संघाने ११ धावांनी विजय मिळवला.

भारताच्या या विजयात ऑफ स्पिनर असणाऱ्या दिप्ती शर्माने महत्त्वाचा वाटा उचलला. दिप्तीने सुरवातीचे तीन षटके निर्धाव टाकली होती. या तीन षटकातच तिने तीन विकेटही मिळवल्या होत्या. पण तिने टाकलेल्या तिच्या चौथ्या षटकात ८ धावा निघाल्या.

या विक्रमानंतर आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात तीन षटके निर्धाव टाकणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. याआधी पुरुष आणि महिला भारतीय क्रिकेटपटूंध्ये टी२० सामन्यात ३ निर्धाव षटके कोणालाही टाकता आली नव्हती. याआधी भारताकडून पुरुषांमध्ये हरभजन सिंग, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांनी तर महिलांमध्ये रुमेली धर, झुलन गोस्वामी आणि पुनम यादव यांनी हि कामगिरी केली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!