Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

गुलाबी कसोटी : सर्वात प्रथम ‘या’ संघांनी खेळली दिवस-रात्र कसोटी

Share

नाशिक : सर्वात प्रथम दिवस-रात्र कसोटी ही २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खेळली गेली. १८७७ मध्ये सर्वात प्रथम अधिकृत कसोटी खेळली गेली. त्यानंतर १९७१ मध्ये पहिली वन-डे मॅच खेळली गेली.

यानंतर १९९२ च्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये खेळाडूंच्या जर्सीचा रंग बदलला आणि वन-डे क्रिकेटला एकप्रकारे ग्लॅमरचे स्वरुप आले. यामुळे साहजिकच पारंपरिक पांढर्‍या जर्सीत खेळणारे खेळाडू आणि पाच दिवस चालणारे टेस्ट क्रिकेट रटाळ वाटू लागले. यात पुन्हा बहुतांश टेस्टचा निकालच लागत नसल्याने क्रिकेटफॅन्स टेस्ट क्रिकेटकडे पाठ फिरवू लागले. २००४ मध्ये पहिली टी-२० इंटरनॅशनल मॅच खेळली गेली आणि क्रिकेटचा चेहरा-मोहराच बदलला गेला.

क्रिकेटचा मूळ गाभा असलेल्या टेस्ट क्रिकेटला वाचवण्यासाठी आयसीसीची धडपड सुरू झाली. ३६ वर्षांनी म्हणजे २०१५ मध्ये डे-नाईट टेस्टला सुरुवात झाली. सर्वात प्रथम ऑस्ट्रेलियातील ऍडलेड स्टेडियमवर २०१५ मध्ये पहिली डे-नाईट टेस्ट खेळली गेली. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये ही टेस्ट खेळली गेली. आतापर्यंत ११ डे-नाईट टेस्ट खेळल्या गेल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया,पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिजमध्ये आतापर्यंत डे-नाईट टेस्ट खेळल्या गेल्या आहेत. भारतात प्रथमच कोलकाता इथे डे-नाईट टेस्ट खेळली जाणार आहे. डे-नाईट टेस्ट आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने आपले वर्चस्व राखले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!