Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

आंबेडकरी चळवळीतील ‘राजा’ हरपला…

Share

मुंबई : आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, दलित पँथरचे एक संस्थापक, लेखक राजा ढाले यांचे मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले आहे. आज सकाळी त्यांच्या विक्रोळीतील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत बुधवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

ढाले यांच्या जाण्याने दलित चळवळ, बौद्ध साहित्यविश्व, आणि आंबेडकरी विचार चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना, चळवळीतील कार्यकर्ते आणि साहित्यक्षेत्रात व्यक्त होत आहे.

उद्या (दि. १७) दुपारी १२ वाजता विक्रोळी पूर्वेला असलेल्या त्यांच्या निवासस्थानातून अंत्ययात्रा सुरु होईल आणि दादर चैत्यभूमी या ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे.

दलित पॅंथरची स्थापना त्यांनी नामदेव ढसाळ आणि अरुण कृष्णाजी कांबळे यांच्या मदतीने केली होती. आंबेडकरी चळवळ पुढे नेणाऱ्या, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानणाऱ्या विचारवंतांमध्ये त्यांची गणना होत होती.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!