महापौरावर झालेल्या हल्ल्याची क्राइम ब्रांचमार्फत चौकशी करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरें

महापौरावर झालेल्या हल्ल्याची क्राइम ब्रांचमार्फत चौकशी करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरें

नागपूर : महापौरावर झालेल्या हल्ल्याची क्राइम ब्रांचमार्फत चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. गुंडगिरी करणाऱ्यांचा मुलाहिजा बाळगणार नाही. पोलीस आयुक्तांकडून माहिती घेतली असून, आज महापौरांना भेटणार असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

दरम्यान नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेने संपूर्ण नागपूर शहरात खळबळ उडाली आहे. यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. ही अत्यंत गंभीर अशा प्रकारची बाब आहे, जर महापौर सुरक्षित राहणार नसतील, तर याची गांभीर्यानं दखल घेण्याची आवश्यकता असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं आहे.

या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हल्ल्याची चौकशी क्राईम ब्रांचमार्फत करणार असल्याचे सांगितले असून लवकरच अज्ञात हल्लेखोरांना अटक करण्यात येईल असल्याची माहिती यावेळी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com