#HappyBirthdayMitaliRaj : व्हायचं होत डान्सर झाली भारतीय महिला संघाची कर्णधार

#HappyBirthdayMitaliRaj : व्हायचं होत डान्सर झाली भारतीय महिला संघाची कर्णधार

मुंबई : भारताची स्टार क्रिकेटपटू मिताली राजने आज ३७ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. जसे पुरुष क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला महान म्हटले जाते. तसे महिला क्रिकेटमध्ये मिताली राजने ते स्थान पटकावले आहे. भारतीय महिला टीमला उत्तुंग शिखरावर नेण्यामध्ये मिताली राजचे विशेष योगदान आहे. भारतीय महिला क्रिकेटलासर्वोच्च स्थानावर नेणाऱ्या या खेळाडूचं नाव-मिताली राज. मिताली आज तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करीत आहे.

मिताली राज चा जन्म ३ डिसेंबर १९८२ रोजी राजस्थानच्या जोधपूर येथे झाला असून तिला नृत्यात करिअर करायचे होते. परंतु तिने क्रिकेटची बॅट उचलली आणि जगभरातील गोलंदाजांना बॅटने खेळण्यास सुरवात केली.

१९९९ साली १७ वर्षाची असतांना आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळला आणि क्रिकेटविश्वात पदार्पण केले. लष्करी कुटुंबातून आलेली, मिताली आठ वर्षांची असताना शास्त्रीय नृत्य शिकत होती. पण त्यानंतर वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्याने हातात बॅट घेतली आणि हैद्राबादच्या सेंट जॉन स्कूलमध्ये आपल्या मोठ्या भावासोबत क्रिकेटचे प्रशिक्षण सुरू केले. त्यानंतर मितालीला क्रिकेटमध्ये आवड निर्माण झाल्याने पुरुष क्रिकेटमध्येही सहभाग घेऊ लागली.

मितालीने पदार्पण केलेल्या पहिल्या वनडेमध्ये ११४ धावांची नाबाद खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याच सामन्यात पहिल्या विकेटसाठी रेशमा गाँधी बरोबर २५८ धावांची भागीदारी केली होती. आतापर्यंत २०० सामन्यात ६ हजार धावा करणारी एकमेव खेळाडू ठरली आहे. सध्या भारतीय संघाची कर्णधार म्ह्णून मिताली क्रिकेट गाजवत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com