राजकीय सत्तानाट्य : काँग्रेस नेते दिग्विजय सिंग ट्विटद्वारे केले सुप्रिया सुळेंचे ‘अभिनंदन’
Share

मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा हात सोडत भाजपशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली. त्यामुळे पक्षासोबतच पवार कुटुंबातही उभी फूट पडल्याचं राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या राजकीय सत्तानाट्यात काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी सुप्रिया सुळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान राजकीय सत्तानाट्याला अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे वेगळे वळण मिळाले आहे. यावर दिग्विजय सिंग यांनी ट्विट करत सुप्रिया सुळेंना शुभेच्छा दिल्या आहेत. ते या ट्विटमध्ये म्हणतात कि, ‘राष्ट्रवादीचे ५४ पैकी ५३ आमदार शरद पवार यांच्यासोबत राहतील. अजित पवार एकटे पडतील. शरद पवारांच्या राजकीय वारसदाराचा प्रश्नही मिटेल. सुप्रिया अभिनंदन.
NCP के ५४ में से ५३ शरद पवार जी के साथ रहेंगे। अजीत पवार अकेले रह जायेंगे। शरद पवार के उत्तराधिकारी की समस्या भी हल हो गयी। बधाई सुप्रिया!!
— digvijaya singh (@digvijaya_28) November 24, 2019
तर अजित पवार यांच्या भाजपासोबत जाण्याने आणि पवार कुटुंबियात फूट पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे आता अजित पवार एकटे पडणार, त्यामुळे याचा फायदा नक्कीच सुप्रिया सुळे यांना होणार असून शरद पवार यांचा उत्तराधिकारी होण्याचा मानही त्यांना मिळणार असे एकूणच चित्र तयार व्हायला लागले आहे.