Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

पूरग्रस्त भागासाठी ६ हजार ८०० कोटींचा प्रस्ताव; मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री एक महिन्याचा देणार पगार

Share

मुंबई : राज्यातील पूरग्रस्त भागासाठी केंद्र शासनाकडे ६ हजार ८०० कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारने केला आहे. तसेच या लोकांच्या मदतीला राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन पूरग्रस्तांना मदत करणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले कि, राज्यातील एकूण पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर ६८०० कोटींची मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून निधी देण्याची विनंती केली आहे. तसेचज नाशिक, कोकण या भागासाठी देखील या निधीतून मदत करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तसेच या महापुरात कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातील अनेक कुटुंबाची वाताहत झाली. त्या पडलेल्या घरांचेही पुनर्वसन म्हणजेच नव्याने बांधून दिली जाणार आहेत.

या निधीतून कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्रच्या भागसाठी २१०५ कोटी, तर कोल्हापुर, सांगली आणि सातारा यासाठी ४७०० कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. यामध्ये पिकांच्या नुकसानीसाठी – २ हजार ८८ कोटी रुपये, सार्वजनिक आरोग्य आणि अतिरिक्त मनुष्यबळ – ७५ कोटी, रस्ता दुरुस्तीसाठी – ५७६ कोटी, तात्पुरत्या छावण्यांसाठी – २७ कोटी, जनावरांसाठी – ३० कोटी, स्वच्छतेसाठी – ७९ कोटी अशा प्रकारे निधी देण्यात येणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!