Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

मुख्यमंत्री पद आरक्षित; उपमुख्यमंत्रीपदासाठी ‘सेना’ ठोकू शकते दावा : फडणवीस

Share

मुंबई : महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आलं आहे. निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

शिवसेनेच्या युतीबाबत ते म्हणाले कि, आम्ही नक्कीच एकत्र लढू, परंतु मुख्यमंत्री पद रिझव्हर्ड असून उपमुख्यमंत्री पदासाठी शिवसेना निर्णय घेऊ शकते, असे त्यांनी विधान केले आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह हरियाणाच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले कि, शिवसेनेचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे यांचे राजकीय क्षेत्रात स्वागत आहे. तसेच शिवसेनेसाठी हा एक महत्वाचा बदल असणार आहे. तसेच लवकरच युतीच्या जागावाटपाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!