Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या हिट-चाट

Video : डोळ्यांच्या कडा ओलावणारा ‘छपाक’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Share

मुंबई :बहुचर्चित आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणचा प्रमुख भूमिका असलेला छपाक चित्रपटाचा ट्रेलर आज अखेर प्रदर्शित झाला. ऍसिड हल्ला तरुणी लक्ष्मी अग्रवाल हिच्या सोबत झाली ती दुर्दैवी घटना आणि त्या घटनेनंतर तिने सुरु केलेला लढा या ट्रेलरमधून दाखविण्यात आला आहे. अंगावर काटा आणणारा आणि डोळ्यांच्या कडा ओलावणारा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

दरम्यान य ट्रेलरमध्ये दीपिकाच्या दमदार अभिनयाची झलक पाहायला मिळत आहे. मेघना गुलझार दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरने चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे.

दीपिकामध्ये दिसणार्‍या अ‍ॅसिड अटॅक वाचलेल्या लक्ष्मी अग्रवालची ही फिल्म आहे. ट्रेलरची सुरूवात निर्भया प्रकरणातील प्रचंड गर्दीच्या रागाने होते आणि त्यानंतर अ‍ॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या मालतीची कहाणी सुरू होते.

या सिनेमात विक्रांत मेसी दीपिकाच्या (लक्ष्मीच्या) बॉयफ्रेंडची भूमिका साकारणार आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित हा सिनेमा १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होईल.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!