Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय विधानसभा निवडणूक २०१९

आम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही; शिवसेनेने आघाडीसोबत सरकार स्थापन कराव : चंद्रकांत पाटील

Share
सरकारची कर्जमाफी फसवी - चंद्रकांत पाटील, Farmers Loan Free Chandrakant Patil Statement

मुंबई : अखेर सत्तास्थापनेचा तिढा सुटला असून भाजपने सत्ता स्थापनेसाठी नकार दिला आहे. त्याऐवजी शिवसेनेने आघाडीसोबत सरकार स्थापनेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईत भाजपच्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हि घोषणा दिली आहे.

ते यावेळी म्हणाले कि, निवडणुकीत युतीला मतदारांनी जनादेश दिला असला तरी शिवसेनेला भाजपसोबत सत्ता स्थापन करावयाची नसल्याने आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही. त्यामुळे शिवसेनेने जनादेशाचा अपमान केल्याची टीकाही यावेळी पाटील यांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून दोन आठवडे झाले तरीही सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपानं सत्ता स्थापनेचा दावा केला नव्हता. अखेर शनिवारी (९ नोव्हेंबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले होत. त्यानंतर भाजपानं सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्या होत्या. रविवारी भाजपाच्या कोअर कमिटीच्या दोन बैठका झाल्या. ४ वाजता झालेल्या बैठकीनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!