Type to search

हिट-चाट

हास्याचा तडका आता सोमवार ते गुरुवार लागणार

Share

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. होऊ दे व्हायरल या यशस्वी पर्वानंतर आता झी मराठीचे लाडके कलाकार ‘शेलिब्रिटी पॅटर्न’ या नव्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत.सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता छोट्या पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो.

 पण आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे हा हास्यकल्लोळ आताफक्त सोमवार मंगळवारीच नाही तर आठवड्यातून ४ दिवस होणार आहे.

आता प्रेक्षक सोमवार ते गुरुवार त्यांच्या आवडत्या कलाकारांना कॉमेडी करताना पाहू शकणार आहेत. तेव्हा पाहायला विसरू नका चलाहवा येऊ द्या – शेलिब्रिटी पॅटर्न सोमवार ते गुरुवार रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!