Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

मुंबई : मध्य रेल्वेच्या नव्या एसी लोकलला महिला पायलट; जानेवारीत उद्घाटन

Share

मुंबई : सेंट्रल रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास आता थंड होणार असून नवी एसी लोकल ट्रेन लवकरच रूजू होणार आहे. कुर्ला कारशेडमध्ये हि नवी एसी लोकल दाखल झाली असून जानेवारी २० मध्ये प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

मुंबई म्हटली लोकलचा प्रवास आणि या शहरातील हवामान उष्ण असल्याने लोकलमधील गर्दीचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. अशातच एसी लोकल चा प्रयोग मुंबईत होत असल्याने फायदेशीर ठरणार आहे. परंतु ही ट्रेन मध्य मार्गावरील मेन लाईनवर धावणार की ट्रान्स हार्बर लाईनवर धावणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

दरम्यान मुंबईमध्ये यापूर्वी डिसेंबर २०१७ पासून चर्चगेट ते विरार या पश्चिम रेल्वेमार्गावर एसी लोकल चालवली जात आहे. त्यामुळे आता ही लोकल पश्चिम लोकलप्रमाणेच मध्य रेल्वे मार्गावर देखील धावणार असल्याने मध्य प्रवाशांसाठी ही खूषखबर आहे. यापूर्वी एसी लोकल आणि प्लॅटफॉर्मची उंची यामध्ये तफावत होती. त्यामुळे नवी एसी लोकल आता सीएसएमटी पासून कल्याण, खोपोली मार्गावरही धावू शकते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!