मुंबई : प्रसिद्ध सीए निलेश विकमसे यांच्या मुलीचा रेल्वे ट्रॅकवर सापडला मृतदेह

0
मुंबई : बुधवारी रात्री प्रसिद्ध सीए आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) चे अध्यक्ष निलेश विकमसे यांची मुलगी पल्लवीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला आहे.
गुरुवारी पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.
पल्लवीने मृत्यूपूर्वी एक मेसेज कुटुंबियांना पाठवला होता. त्यात माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर तिचा फोन बंद झाला होता.
पोलिस या प्रकरणाचा आत्महत्या की हत्या याचा तपास करत आहे.
पल्लवी (20) प्रसिद्ध चार्टर्ड अकाऊंटंट फर्म खीमजी कुंवरजी अँड कंपनीचे पार्टनर निलेश विकमसे यांची सर्वात छोटी मुलगी होती. निलेश 35 वर्षांपासून आयसीएआयचे सदस्य आहेत.
पल्लवीने कायद्याचे शिक्षण घेतलेले होते. ती इंटर्नशिप करत होती. बुधवारी सायंकाळी 6 वाजता पल्लवी ऑफिसमधून घरी येण्यासाठी निघाली. ती सीएसटी स्टेशनवरुन लोकलने घराकडे निघाली होती.
तोपर्यंत तिचा मोबाइल सुरु होता. पल्लवी उशिरा रात्रीपर्यंत घरी आली नाही तेव्हा कुटुंबियांनी तिच्या मित्र-मैत्रिणींशी संपर्क केला.

LEAVE A REPLY

*