Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

मुख्यमंत्री ते विधान मागे घेवो अथवा नको; मुख्यमंत्री पदचं हवंय त्यावर बोला – राऊत

Share

मुंबई | प्रतिनिधी

शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आल्यानंतर  मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करताना म्हणाले होते की, पुढील ५ वर्ष मीच मुख्यमंत्री पदावर राहणार आहे.

अडीच-अडीच वर्षाचा शब्द कधीच दिला नाही असे मुख्यमंत्री म्हणाले होते. सेना यानंतर प्रचंड आक्रमक होताना दिसली, त्यामुळे सत्तास्थापनेचे भाजपसाठी शिवसेनेने बंद केले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे ते विधान मागे घेण्याची तयारी भाजपच्या गोटातून ऐकू आली आली होती.

यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवं आहे, यावर चर्चा करायची असेल तरच पुढे या अन्यथा कुठलीही गरज नाही. यानंतर पुन्हा एकदा सत्तानाट्यला कलाटणी मिळाली असून मुख्यमंत्र्यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली आहे. यात मुख्यमंत्री काय बोलतील याकडे नजरा खिळल्या आहेत.

आज विधानसभेचा कार्यकाल संपृष्टात येत आहे. मुख्यमंत्र्यांना आज जर सत्ता स्थापनेचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले नाही तर त्यांना रीतसर राजीनामा द्यावा लागणार आहे.

आज संभाजी भिडे, नितीन गडकरी यांनी शिवसेनेच्या पाठींब्यासाठी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुठलीही बोलणी करण्यात दोघे यशस्वी झाले नसल्याचे बोलले जात आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!