Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘एसटी’चे एक पाऊल पुढे; उत्पन्नवाढीसाठी पालक अधिकारी नेमणार

Share
विद्यार्थ्यांसाठी वेळांचे रास्त नियोजन करा; अनिल परब यांची एसटी महामंडळाला सूचना; MSRTC : Need to make planning for students travell - Anil Parab

मुंबई | प्रतिनिधी 

लग्न, यात्रा, धार्मिक व शैक्षणिक सहली या करीता प्रासंगिक करारावर एसटी बसेस उपलब्ध करून देण्याचे प्रमाण वाढवून एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढावे
यासाठी एसटी महामंडळामार्फत नियोजन करण्यात येत असून विभागीय पातळीवरील अधिकारी, पर्यवेक्षक यांची पालक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे.

विभागीय स्तरावर मागील आर्थिक वर्षात झालेल्या प्रासंगिक कराराचा आढावा घेऊन ज्या संस्थांनी यापूर्वी प्रासंगिक करारावर एसटी बस घेतली होती. अशा
संस्थांशी विभाग/आगार पातळीवर संपर्क साधून शैक्षणिक सहलींसाठी बसेस  उपलब्ध करून द्याव्यात.

ज्या संस्थांनी यापूर्वी एसटी महामंडळाची बस न घेता खाजगी बसेस वापरल्या असतील अशा संस्थांशी संपर्क साधून महामंडळाच्या बसेस घेण्याबाबत प्रयत्न याद्वारे करण्यात येणार आहेत.

विभागीय स्तरावर प्रत्येक आगारासाठी आवश्यकतेप्रमाणे स्वतंत्र नियते मंजूर करावी. कोणत्याही कारणास्तव प्रासंगिक करारावर बसेसची मागणी नाकारू नये अशा सूचना एसटी प्रशासनाने  संबंधितांना दिल्या आहेत. प्रासंगिक करारावर बसेस उपलब्ध करून देण्यासाठी कोणतेही बस मार्ग बंद राहणार नाहीत किंवा कामासाठी अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबतही कळविण्यात आले आहे.

शैक्षणिक संस्था व सामाजिक संस्थां किंवा व्यक्ती यांनी एसटी महामंडळाच्या बसेस प्रासंगिक  करारावर घ्याव्यात, असे आवाहन एसटी महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!