Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

भाजप नेत्यांचा सभात्याग; अधिवेशन बेकायदेशीर असल्याचा भाजपचा आरोप

Share

मुंबई । प्रतिनिधी 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत मांडला जाण्याआधीच मंत्र्यांचा शपथविधी बेकायदेशीर झाला असल्याचा आरोप भाजपने केली.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातून बाहेर पडत सरकारने हे अधिवेशन नियमाला धरुन नसल्याचे म्हटले आहे. तर नव्या अधिवेशनाचा समन्स काढण्यात आलेला नसल्याचे फडणवीस म्हणाले.

त्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. ठाकरे सरकारची ही पहिली अग्निपरीक्षा पास झाली असून १६९ आमदारांनी पाठींबा दर्शिवला आहे.

तर भाजप सदस्यांनी सभात्याग केला चार सदस्य यावेळी तटस्थ राहिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करण्यात आला.

अशोक चव्हाण यांनी प्रस्ताव मांडला, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, जयंत पाटील आणि शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू यांनी अनुमोदन दिलं. यावेळी भाजप आमदारांचा अखेर सभात्याग केला, विश्वासदर्शक ठरावावर बहिष्कार टाकण्यात आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!