उमेदवारांच्या नावापुढे जात लावल्याचे कारण डॉ. प्रकाश आंबेडकरांनी सांगितले

0

मुंबई | वृत्तसंस्था

वंचित बहुजन आघाडीच्या 37 उमेदवारांची यादी काल जाहीर करण्यात आली. यादीत सर्वच उमेदवारांच्या नावापुढे जातीचा उल्लेख करण्यात आल्यामुळे कालपासून सर्वत्र या गोष्टीची चर्चा तसेच टीका टिपण्णी होत होती.

यानंतर आंबडेकरांनी जातीचा उल्लेख का केला याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले, निरनिराळ्या समाजातील लोकांना उमेदवारीची संधी देण्यात आली असून ही नवी पद्धत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही जात जाहीर केली. कारण ही प्रणाली कोणताही पक्ष स्वीकारत नाही.

शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात मराठ्यांव्यतिरिक्त कुणालाच उमेदवारी दिली जायची नाही. हीच पद्धत पुढे घराणेशाहीत बदलली. यामुळे आपण प्रामुख्याने उमेदवारांच्या नावापुढे जातीचा उल्लेख केला आहे. यामुळे पुढील राजकारणाची दिशा बदलणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काल वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. उमेदवारांच्या नावाच्या पुढे कंसात जातीचा उल्लेख करण्यात आला होता.

यात वंजारी, बौद्ध, धिवर, माना आदिवासी, माळी, बंजारा, धनगर, मुस्लिम, कैकाडी, मातंग, शिंपी, कोळी, विश्वकर्मा, वडार, होलार, कुणबी, लिंगायत, भिल्ल, वारली, मराठा, आगरी अशा समाजातील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये सात डॉक्टर, तीन प्राध्यापक व दोन वकिलांचा समावेशदेखील आहे.

LEAVE A REPLY

*