Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या राजकीय

सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणार; महायुतीची दारं अजूनही उघडी – मुख्यमंत्री

Share

मुंबई | प्रतिनिधी

आज राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करून आलो आहे, राज्यपालांच्या आदेशानुसार आपण राज्यात सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहणार आहोत. गेले पाच वर्ष मला महाराष्ट्राच्या जनतेचे मला संधी दिली, मला निवडून दिले त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो असे मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले अजूनही वेग गेलेली नाही,  आपण सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणार आहोत तसेच महायुतीसाठी दारं उघडी असल्याचेही त्यांनी सांगत अद्याप युती तुटली आहे हे स्पष्ट केलेले नाही.

सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपने १०५ जागा मिळवल्या. जे काम आम्ही केलं. त्या कामाची पावती जनतेने दिली. ज्या प्रामाणिकतेने असहकार चाललेलं .त्याप्रमाणेच सरकार चाललं अपक्षेपेक्षा जागा कमी आल्या याची खंत राहिलच असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी, पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितले कि, सरकार बनविण्याचे सर्व मार्ग खुले आहेत. लोकांनी महायुतीला मतदान केले होत. मग असं का? आमचं लोक त्याचे लोक असच नव्हतंच मुळी, आम्ही महायुतीचे सरकार तयार करू, असे सांगितले होते, परंतु गेले पंधरा दिवस ज्या प्रकारची वक्तव्य पाहायला मिळताय त्यामुळे आपल्याला धक्का बसला आहे.

राज्यातील जनतेने कौल महायुतीला दिला आहे. विरोधी पक्षांचीदेखील तीच भूमिका आहे, की शिवसेना आणि भाजपने मिळून सत्ता स्थापन करावी. त्यामुळे आगामी काळात भाजपकडून सत्ता स्थापणेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद मुद्दे

१. आताच राज्यपालांना भेटून राजीनामा सादर केला, त्यांनी तो स्वीकारला.

२. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, सर्व सहकारी, अधिकारी, माझ्या सोबत असलेले मित्रपक्ष आणि त्यांच्या नेत्यांचे आभार

३. प्रमाणिकपणे पारदर्शकपणे महाराष्ट्रात काम करण्याचा प्रयत्न केला. मागील 5 वर्षातील 4 वर्ष दुष्काळाची, हे वर्ष अतिवृष्टीचं, या सर्व संकटांमध्ये शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम आमच्या सरकारनं केलं.

४. महायुतीला जनतेने संपूर्ण बहुमत, 160 पेक्षा जास्त जागा आम्हाला, 105 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, लढलेल्या जागांपैकी 70 टक्के जागांवर विजय

५. निकालाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत सरकार बनवण्याचे सर्व मार्ग खुले असल्याचं सांगितलं होतं, तो आमच्यासाठी धक्का होता, कारण जनतेने महायुतीला मतदान केलं होतं

६. मी पहिल्याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आभार मानत महायुतीचं सरकार येईल असं म्हटलं होतं

७. : माझ्यासमोर कधीही अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाचा विषय झाला नव्हता, हे पुन्हा सांगतो

८. अमित शाहांना विचारणा केली, तेव्हा त्यांनीही अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा झाली नसल्याचं सांगितलं, कोणाला खोटं पाडण्याचा प्रश्नच नव्हता, परंतु चर्चेने हा विषय मिटवता आला असता

९. उद्धवजी ठाकरेंच्या वक्तव्याने धक्का

१०. चर्चा आम्ही थांबवलेली नाही, दारं खुली होती, परंतु चर्चा शिवसेनेकडून बंद झाली, यात पूर्ण सत्य आहे

११. शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा करायला वेळ होता, परंतु आमच्याशी चर्चा करायची तयारी नव्हती

१२. उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूची लोकं ज्याप्रकारे वक्तव्य करत आहेत, त्यांनी सरकार होत नसतं, आम्हाला उत्तर देता येत नाही, असं समजू नये. आम्ही जोडणारे आहोत, तोडणारे नाही

१३. विरोधीपक्षातील नेत्यांनी केलेली वक्तव्य आम्ही समजू शकतो, पण आमच्या सोबत केंद्रात आणि राज्यातही राहायचं आणि खालच्या पातळीवर टीकाही करायची, हे चालणारं नाही

१४. भाजप सरकार तयार करताना कोणतंही फोडाफोडीचं राजकारण करणार नाही, आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावे, अन्यथा माफी मागावी

१५. सरकार स्थापन करण्यास जो विलंब झाला, त्याला जो कोणी कारणीभूत असेल, तरीही मला खंत वाटते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!