मुंबई स्फोटातील दोषी आरोपी मुस्तफा डोसाचा मृत्यू

0

मुंबई, ता. २८ : मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बाँबस्फोट मालिकेतील मुख्य आरोपी मुस्तफा डोसाचा आज जे.जे. रुग्णालयात मृत्यू झाला.

आज सकाळीच त्याला उच्च रक्तदाब आणि छातीत वेदना होत असल्याने उपचारासाठी तुरूंगातून जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्याच्यावर यापूर्वी बायपास शस्त्रक्रिया झाली होती.

अलिकडेच विशेष न्यायालयाने त्याला दोषी ठरविल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सरकारी वकील करणार होते.

त्यावेळी मुस्तफा न्यायालयात ढसाढसा रडला होता. आपल्याला मरेपर्यंत तुरूंगात डांबा, पण फाशी देऊ नका अशी विनवणीही त्याने केली होती.

LEAVE A REPLY

*