Type to search

हिट-चाट

केदारनाथच्या महाप्रलयाची कहानीचा ट्रेलर प्रदर्शित

Share

मुंबई : २०१३ साली उत्तराखंडमध्ये आलेल्या विध्वंसक पुरामध्ये केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेले व मंदिर परिसराचे देखील मोठे नुकसान झाले. नुकताच केदारनाथ महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आलेल्या केदारनाथ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. एक हिंदू तरूणी आणि एक मुस्लीम तरूणाची प्रेमकथा यात चित्रित करण्यात आली आहे.

सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूतची निसर्गाच्या क्रोधाच्या पार्श्वभूमीवर फुलणारी प्रेमकथा या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. केदारनाथमधील मनोहारी दृश्ये, विनाशकारी महाप्रलय सगळे काही चित्तथरारक आहेत. या चित्रपटातून सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. पण ट्रेलरमध्ये तिचा वावर अगदी कसलेल्या अभिनेत्रीसारखा आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या अभिनयाचीही अतिशय दमदार खेळी या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय आणि अभिषेक कपूर यांचे दिग्दर्शन चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवण्यात यशस्वी झाले आहे. हा चित्रपट येत्या ७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!