‘दबंग ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार

0

मुंबई : दबंग चित्रपटाच्या २ सिरीज नंतर प्रेक्षकांना उत्सुकता असलेला दबंग ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पुढच्या वर्षी सलमान खानचा सुपरहिट दंबग चित्रपटाच्या सीरिजचा तिसरा चित्रपट ‘दंबग-३’ रिलीज होणार आहे. काल ट्वीट करत सलमान खानने याबाबतची माहिती दिली आहे. या चित्रपटाची घोषणा सलमानने अनोख्या अंदाजामध्ये केली. आठ वर्षापूर्वी याच दिवशी ‘दंबग’ चित्रपट रिलीज झाला होता.

आपल्या ट्वीटमध्ये सलमानने म्हटले की, आज दंबग चित्रपटाला आठ वर्ष झाली. तुमचे प्रेम आणि कौतुक याबद्दल रज्जो आणि चुलबुल पांडेकडून सर्वांचे आभार. दबंग-3 मध्ये पुढच्या वर्षी भेटुया. सलमान खान ‘भारत’ आणि ‘दबंग-३’ चित्रपटाचे शुटिंग एकत्र करणार असल्याचही बोलले जात होते. तसेच सप्टेंबर महिन्यात दबंग-3चे शुटिंग सुरू होणार असल्याचीही माहिती होती. पण सलमानच्या घोषणेनंतर सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

दंबग-३ चित्रपटाच्या शुटिंगबाबत सोनाक्षीने याआधी माहिती दिली होती. चित्रपटाचे काम या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवा करणार असून मी पुन्हा या चित्रपटाचा भाग होण्यासाठी उत्सुक असल्याचे काही दिवसांपूर्वी सोनाक्षीने सांगितले होते. तसेच रज्जोशिवाय चुलबुल अधुरा असल्याचेही सोनाक्षीने म्हटल्यामुळे दबंग-३ चित्रपटा नक्की करणार असल्याचे सोनाक्षीने सांगितले होते.

LEAVE A REPLY

*