Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

विमान दुर्घटना टाळण्यासाठी ‘या’ साधनाचा वापर करतात

Share

मुंबई : दोन दिवसांपूर्वी हरयाणातील अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर लढाऊ जग्वार विमानाचा मोठा अपघात टळला. या विमानाची आकाशात उडणाऱ्या पक्ष्याशी धडक झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करावी लागली.

दरम्यान जेव्हा विमानाचा अपघात होतो तेव्हा त्यामागच्या कारणांचा शोध घेतला जातो. त्याचबरोबर नेमका अपघात कसा झाला याची माहिती घेण्यासाठी विमानातील ब्लॅक बॉक्स चा उपयोग होतो. तो प्रत्येक विमानात असतो. त्यामुळे अपघात झाल्यानंतर पहिल्यांदा त्याचा शोध घेतला जातो.

तर जाणून घेऊया ब्लॅक बॉक्स म्हणजे काय असत ?

*ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या मागील बाजूस बसवलेला असतो. कारण दुर्घटनेच्या परिस्थितीत सर्वात सुरक्षित भाग समजला जातो.
* हा भाग भगव्या रंगाचा असतो. जेणेकरून अपघातस्थळी बचाव पथकास भडक रंग त्वरित आढळून येईल .
*एफडीआरद्वारे अपघाताआधी २५ तासांचा तपशील मिळतो तर सीव्हीआरद्वारे २ तासांचा तपशील मिळतो.

या ब्लॅक बॉक्समध्ये काय असते ?
एखाद्या विमानाच्या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी दोन उपकरण महत्वाची असतात. १) विमानाचे फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि २)कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर यालाच ब्लॅक बॉक्स म्हणतात. एका उपकरणामध्ये कॉकपीटमधील संभाषण रेकॉर्ड होते तर दुसऱ्या उपकरणात विमानाशी संबंधित आकडे, वेग, आणि उंचीचे मोजमाप होते. या बॉक्समध्ये रेकॉर्ड झालेल्या विमान दुर्घटनेच्या कारणांची माहिती मिळू शकणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!