Video : बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा प्रोमो रिलीज

0

मुंबई : बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाच्या अफाट यशानंतर या कार्यक्रमाच्या नव्या सीझनचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. बिग बॉसच्या घरात यावर्षी कुणाची वर्णी लागणार याविषयी चर्चा सुरु झाली आहे.

बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांना यंदा बिग बॉसच्या घरात कोणाकोणाचा समावेश असणार याची उत्सुकता लागली होती. आज शोचे होस्ट महेश मांजरेकरांनी बिग बॉस चा पहिला प्रोमो (बिग बॉस मराठी २ प्रोमो) शेअर करत त्याची हिंट दिली आहे. राजकीय प्रचाराची धामधूम यंदा बिग बॉसच्याही घरात दिसणार आहे.

खुद्द महेश मांजरेकर राजकारण्याच्या वेषात पहायला मिळाले आहेत. शुभ्र पांढरा सदरा, समोर बघ्यांची गर्दी… आश्वासनांचं झाड लावणारे, लावणार का च्या घरात वर्दी? बिग बॉस मराठी 2 च्या पहिल्या प्रोमोनुसार यंदा घरात राजकारणातील एखादी व्यक्ती दिसणार अशी शक्यता वाढली आहे. आता ही व्यक्ती कोण असेल ? याचा अंदाज रसिक लावतीलच पण लवकरच हे नाव कोण असेल याचा उलगडा होणार आहे.

LEAVE A REPLY

*