Type to search

Breaking News टेक्नोदूत मार्केट बझ मुख्य बातम्या

‘फेस अँप’ वापरात असाल तर सावधान; १५ कोटी युझरची प्रायव्हसी धोक्यात

Share

मुंबई : तुम्ही फेसअ‍ॅपचा वापर करत असाल तर तुम्ही अ‍ॅपला तुमचे फोटो, नाव, युजरनेम यासह तुम्हाला काय आवडतं या गोष्टींची माहिती वापरण्याची परवानगी देत आहात.आयओएस युजर्ची सुद्धा या अ‍ॅपमुळे प्रायव्हसी धोक्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. सेटींगमध्ये Allow FaceApp to Access मध्ये Photos Never असं सेट केल्यानंतरही फोनधील फोटो अ‍ॅपला अ‍ॅक्सेस करता येतात.

फेसअ‍ॅप वापरण्यापूर्वी फोनमधील डाटा वापरण्याची वापरण्याची परवानगी विचारली जाते ती दिल्यास फोनमधील संपूर्ण फोटो, व्हिडीओ आणि इतर माहिती संबंधित अँप तयार करणाऱ्या कंपनीच्या सर्व्हरवर सेव्ह होते.

हा डाटा संबंधित कंपनी कोणत्याही कारणासाठी कधीही व कुठेही वापरू शकते व त्यासंदर्भात वापरकर्त्याला कायदेशीर दादही मागता येत नाही, असे अँपला परवानगी देताना येणाऱ्या संदेशात नमूद असते. परंतु, हि माहिती फोनच्या स्क्रीनवर दिसत नाही.

या अँपमध्ये अनेक पर्याय म्हणजेच फिल्टर्स आहेत आणि त्यातीलच ओल्ड फेस फिल्टर लोकप्रिय झालेले आहे तसेच . या अँपमध्ये इतर अनेक फिल्टर आहेत. म्हणजे तरुण रुप पाहण्यासाठीचे फिल्टर, केसांचा रंग बदलण्याचे, चेहऱ्यावर मेकअप करण्याचे तसेच क्रूर हास्य चेहऱ्यावर आणण्याचेही फिल्टर या अँपमध्ये आहे.फेसअ‍ॅप हे आयओएस आणि अ‍ॅन्ड्रॉईड अशा दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे.

फोर्ब्स’ने दिलेल्या वृत्तानुसार १५ कोटीहून अधिक लोकांचा डेटा आता ‘फेसअँप’ची मालक कंपनी असणाऱ्या ‘वायरलेस लॅब्स’ या रशियन कंपनीकडे आहे.

या अँप्लिकेशनमधील सर्वात लोकप्रिय फिल्टर असणाऱ्या ‘ओल्ड एज फिल्टर’च्या माध्यमातून डेटा चोरी होत असल्याचे सायबर तज्ज्ञांनी म्हटले आहे. युझर्सच्या मोबाइलमधील खासगी माहिती आणि ओळख सांगणारा सर्व डेटा या मोफत मिळणाऱ्या अँप आणि फिल्टरच्या माध्यमातून कंपनीच्या सर्व्हरवर अपलोड झाला असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

काही वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अँप्लिकेशनच्या नियम आणि अटींमुळे अँप इन्स्टॉल करताना अनेक युझर्सने त्यांचा डेटा कंपनीला दिला आहे. युझर्सने अँप्लिकेशन इन्स्टॉल करताना दिलेल्या परवाणगीनुसार युझर्सच्या डेटामध्ये कंपनी फेरफार शकते, पुन:निर्मित करु शकते किंवा तो छापण्यासाठीही वापरु शकते असे नमूद करण्यात आले आहे.

लेखक : प्रा य़ोगेश अशोक हांडगे 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!