Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरभ’दादा’; पण दहा महिन्यांसाठीच…

Share

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांची बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. परंतु सौरभ गांगुली केवळ दहा महिन्यांसाठी अध्यक्षपद भूषवणार असल्याची माहिती मिळते आहे.

दरम्यान काही दिवसांपासून बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी चुरस निर्मण झाली होती आज अखेर यावर पडदा पडला असून भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केलेला ४७ वर्षीय सौरभ गांगुली उर्फ दादा अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहे. सध्या गांगुली हे बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहे.

सौरभ गांगुली यास अध्यक्षपद मिळाल असलं तरी ते फार काही काळ नसणार आहे. गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी पुढील दहा महिनेच या पदावर राहू शकतो. सप्टेंबर २०२० पर्यंत या पदावर राहू शकेल. त्यामुळे गांगुलीला बीसीसीआयच्या नव्या संविधानानुसार कूलिंग ऑफ पीरियडमध्ये जावं लागेल. त्याला पुढच्या तीन वर्षांपर्यंत बीसीसीआयचं कोणंतही पद भूषवता येणार नाही.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!