Photo Gallery : भूयार बनवून बँक ऑफ बडोदाचे लॉकर असे फोडले; पाहा ही छायाचित्रे

0

मुंबई ता. १४ : नवी मुंबई येथील जुईनगरच्या बँक ऑफ बडोदातील लॉकर चोरट्यांनी जमिनीत भुयार करून फोडले.

रविवारच्या सुटीनंतर सोमवारी जेव्हा बँक कर्मचारी बँकेत आले तेव्हा बँकेचे कार्यालय सुस्थितीत होते, पण लॉकर रूमची अवस्था पाहून त्यांच्या तोंडचे पाणीच पळाले.

कारण २२५  पैकी ३० लॉकर चोरट्यांनी फोडले होते आणि तेही जमिनीखालून भुयार खोदून.

चोरट्यांनी हा चोरीचा ‘सिनेस्टाईल प्लॅन’ अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने रचला. बँकेसमोरच एका इमारतीत पाच महिन्यांपूर्वी एक दुकान भाड्याने घेतले आणि त्यानंतर भुयाराचे काम सुरू केले.

दिवसा ते येथे किराणा स्टोअर्स चालवायचे आणि रात्री भूयार खोदायचे. या प्रकरणी सानपाडा पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

बँक चोरीची या अनोख्या घटनेची छायाचित्रे देशदूत डिजिटलकडे उपलब्ध झाली असून वाचकांसाठी ती देत आहोत.

LEAVE A REPLY

*