Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

शरद पवारांचं शेवटपर्यंत काहीही ठरू शकतं : बच्चू कडू

Share

मुंबई: ‘महाराष्ट्रात सरकार स्थापन होईपर्यंत शरद पवारांचं काहीही ठरू शकतं’, ते शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाच कळणार नाही, खुद्द त्यांचा पुतण्या अजित पवार यांना माहिती होत नाही तर आम्ही खूप दूर, असं विधान प्रहार संघटनेचे नेते व अपक्ष बच्चू कडू यांनी केले आहे.

दरम्यान सत्ता स्थापनेसंदर्भात अद्यापही राज्यात तळ्यात मळ्यात स्थिती असून येत्या दिवसांत हा तिढा सुटणार अशी शक्यता आहे. यावेळी बच्चू कडू यांनी एका माध्यमाला मुलाखत देताना सांगितले कि, मुख्यमंत्री हा शिवसेनेचा झाल्यास उत्तम राहील. तसेच आपल्या पक्षाचा पाठींबाही शिवनेला असेल , असेही ते म्हणाले. महाशिवआघाडी बाबत त्यांना विचारले असता, त्यांनी मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाबद्दल शंका व्यक्त केली. ‘शरद पवारांचं काहीही ठरू शकतं’, ते शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाच कळणार नाही, असं ते यावेळी म्हणाले.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदासाठी संजय राऊत यांना जोरदार पसंती मिळत आहे. राज्यात मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावांसोबत एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांची देखील नावे मुख्यमंत्रीपदासाठी घेतली जात आहेत. परंतु त्याहूनही जास्त पसंती संजय राऊत यांच्या नावाला मिळत असून लवकरच सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!