Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

#अयोध्या : ‘ती’ जमीन रामंदिराचीच; मुस्लिम बांधवाना दुसरी जागा देणार

Share
न्यायालयातील अनावश्यक गर्दी टाळा - प्रधान न्यायाधीश वाघवसे यांचे आवाहन; Avoid unnecessary rush in court

मुंबई : सर्व देशाचे लक्ष लागून असलेल्या बहुप्रतीक्षित अयोध्या जमीन वाद प्रकरणावर आपला ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. राम मंदीर उभारण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले असून मुस्लिम बांधवाना अयोध्येत पाच एकर पर्यायी जागा देण्यात येणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल आज (९ नोव्हेंबर) दिला आहे. या खटल्याची सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने निकाल दिला आहे.

दरम्यान सुप्रीम कोर्टाने निकाल देताना सांगितले कि, सदर जागा सरकारची असून आता निकाल लागल्याने दोन्ही मंदिराचा विषय मार्गी लागला आहे. तसेच या जागेवर १९५६-५७ पर्यंत याठिकाणी नमाज पठण नाही. त्यापूर्वी याठिकाणी हिंदूकडून पूजा केली जात होती. या जागेवर दावा सांगणारा कोणताही पुरावा सुन्नी वक्फ बोर्डाला सादर करता आला नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. तसेच श्रद्धा ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब आहे. राम जन्म याच ठिकाणी झाला होता, अशी हिंदूची श्रद्धा आहे. तर मुस्लीम याला बाबरी मशिद मानतात. श्रद्धा ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब आहे, असं न्यायालायनं म्हटलं आहे.

या दरम्यान निर्मोही आखाड्याची याचिकाही फेटाळली आहे. निर्मोही आखाडा सेवक असल्याच न्यायालयाकडून अमान्य करण्यात आले आहे. मात्र, रामलल्लाचे कायदेशीर अस्तित्त्व न्यायालयानं मान्य असल्याचे सांगितले आहे. रामजन्मभूमी व्यक्ती नाही, पण भारतीय पुरातत्व विभागाच्या अहवालाकडं दुर्लक्ष करता येणार नाही. बाबरी मशिद रिकाम्या जागी बांधली गेली नाही. गाडल्या गेलेल्या अवशेषांमध्ये हिंदू खुणा सापडल्याचा पुरातत्व खात्याचा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयानं मान्य केला.

तसेच वादग्रस्त जमिनीवर हिंदूंकडून पूजा सुरू होती. हे श्रीरामाचं जन्मस्थान ही हिंदूंची श्रद्धा आहे. या ठिकाणी झालेल्या खोदकामातुन काही पुरावे मिळाले आहेत. ते पुरावे महत्त्वाचे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. एएसआयच्या अहवालात मंदिराचा उल्लेख करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!