Type to search

maharashtra अर्थदूत मार्केट बझ

अक्सिस बॅंकेच्या एमडी आणि सीईओ शिखा शर्मा निवृत्त

Share

मुंबई : अक्सिस बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिखा शर्मा निवृत्त झाल्या आहेत. शिखा शर्मा यांच्या जागी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर अमिताभ चौधरी यांची नियुक्ती झाली आहे. अमिताभ चौधरी यांची नियुक्ती 1 जानेवारी 2019 पासून लागू झाली आहे.

अमिताभ चौधरी यांनी 1987 मध्ये बॅंक ऑफ अमेरिकामधून आपल्या कॉर्पोरेट बँकिंगमधील करियरची सुरूवात केली होती. चौधरी हे एचडीएफसी स्टॅंडर्ड लाईफ इन्श्युरन्स कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

याआधी 8 डिसेंबरला अक्सिस बॅंकेने चौधरी यांची बॅंकेच्या संचालक मंडळावर अतिरिक्त संचालकपदावर नियुक्ती केली होती. त्यांनी पिलानीच्या बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधून बी.टेकची पदवी मिळवली आहे. त्याचबरोबर अहमदाबादच्या आयआयएममधून एमबीएदेखील केले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!