Type to search

Breaking News टेक्नोदूत मार्केट बझ मुख्य बातम्या

खिशाला परवडणाऱ्या ‘या’ दमदार कार्स पाहिल्यात का?

Share

मुंबई : मागील आठ महिन्यांपासून ऑटो क्षेत्रात मंदीचे वातावरण असून पुढील काही दिवसात ही उणीव भरून निघणार आहे. कारण येत्या ऑगस्टमध्ये फेस्टिवल सीजन असल्याने या काळात वाहन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो.

दरम्यान जरो आपणि येत्या फेस्टिवल सिजनमध्ये एखादी कार घेऊ इच्छित असाल तर कमी किमतीत आपल्याला आवडेल अशा कार्स लवकरच बाजारात दाखला होणार आहे.

अगदी कमी कालावधीत लोकांच्या पसंतीस उतरलेली क्विड( KWID) यंदाच्या फेस्टिवल सिजनमध्ये विक्रीला असणार आहे. या कारची वैशिष्ट्ये म्हणजेच कमी किमत, कीमत,स्पोर्टी लुकमुळे  भारतात विशेष क्रेझ आहे. या कारमध्ये ८०० cc इंजिन लागले असून जे ५४ ps क्षमतेचे आहे. तसेच या इंजिनला ५ गेअरबॉक्स असून २५ चा सरासरी आहे. या कारची किमत २. ७६ लाख रुपयापासून पुढे आहे.

काही कुटुंब लहान असल्याने ग्राहक आपल्या कुटुंबानुसार कार पसंद करत असतो. अशा लहान कारमध्ये Datsun ची redi-GO ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. या कारला देखील ८०० cc चे इंजिन लावण्यात आले आहे. हि कार सरासरी २३ किमीने धावते. या कारमध्ये ५ प्रवाशी आरामशीर बसू  शकतात.

मारुती सुजुकीच्या नव्या ऑल्टोला देखील मोठ्या प्रमाणात बाजारात वाव आहे. या कारला BS-6 इंजिन लावण्यात आले आहे.  नव्या  ऑल्टोमध्ये जुने ८०० cc चे लावले आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये ही कार २४. ७ किलोमीटर धावू शकते.  bhartail

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!