Type to search

Breaking News मार्केट बझ मुख्य बातम्या

एटीएम मधून पैसे आले नाहीत पण बँकेतून कट झाले? तर काय करावे?

Share

मुंबई : एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर पैसे मिळाले नाही परंतु खात्यातून पैसे कट झाल्याची बातमी ऐकली असेल. अशा लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

काहीवेळा खात्यातून कट झालेले पैसे २४ तासांत मिळून जातात परंतु काहीवेळा बँकेचे चाह्क्कार माराव्या लागतात. जर तुम्हीही अशाच परिस्थितीत अडकलात तर बँकेकडून कशा प्रकारे भरपाई मिळवाल…. माहित नाही ना.. चला तर मग जाणून घेऊयात.

  • ग्राहकांनी एटीएममध्ये व्यवहार केल्यानंतर पहिल्यांदा एटीएम स्लिप (पावती) आपल्याकडे जपून ठेवावी.
  • आपले बँक खाते असलेल्या बँकेतच तक्रार करावी. तसेच ही तक्रार पुढील ३० दिवसांच्या आत करणे बंधनकारक असते. यामध्ये तुमच्या एटीएम कार्डची संपूर्ण माहिती, अकाऊंट नंबर, एटीएम आयडी अथवा लोकेशन आणि ट्रॉझेक्शनची तारीख, वेळ इत्यादी माहिती बँकेला देणे आवश्यक आहे.
  • बँकेत तक्रार दाखल केल्यानंतर बँकेने ग्राहकास तक्रार संख्या सांगावी लागते. त्यानंतर दिवसांच्या आत बँकेस तक्रार निवारण करणे आवश्यक असते.
  • सात दिवसांच्या आत (कार्यालयीन दिवस) बँक त्या ग्राहकाच्या अकाऊंटमध्ये पैसे पुन्हा टाकेल. जर असे झाले नाही तर, पेमेंट आणि सेटेलमेंट सिस्टम अॅक्ट २००७ अंतर्गत बँक १०० रुपये/दिवस या हिशोबाने नुकसान भरपाई देईल.
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!