शिवसेना नगरसेवक हत्येप्रकरणी अरुण गवळीची जन्मठेप कायम

शिवसेना नगरसेवक हत्येप्रकरणी अरुण गवळीची जन्मठेप कायम

मुंबई : शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान अरुण गवळीने शिक्षेला आव्हान देत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळण्यात आली असून जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.

दरम्यान मार्च २००७ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची मुंबईत हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी २००८ मध्ये अरुण गवळीला अटक केली. या नंतर २०१२ मध्ये विशेष न्यायालायने अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अरुण गवळी यांच्या इशाऱ्यावरूनच ही हत्या करण्यात आल्याचे तपासातून उघड झाले होते.

या हत्येसाठी अरुण गवळीने ३० लाखांची सुपारी दिली होती. न्यायालायने अरुण गवळीसोबत इतर दहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सोबत १४ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला होता. अरुण गवळीने शिक्षेला आव्हान देत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळण्यात असून जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com