Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

मटणाच्या रेसिपी बनवून युट्युबवर लाखो कमविणारे अरुमुगम ‘डॅडी’

Share

मुंबई : जेवण म्हटलं कि आपल्या तोंडाला पाणी सुटते याद्वारे अनेक लोक पैसे कमवितात. अशाच एका सत्तर वर्षीय डॅडीने युट्युबवर मासे मटणाच्या रेसिपी करून लाखो रुपये कमवत आहेत.

तामिळनाडू मधील कोयंबटूर जवळील तिरुप्पूर या छोट्याशा गावात व्हिलेज फूड फॅक्टरी या नावाने यु ट्यूब चॅनेल चालवणारे अरुमुगम नावाचे आजोबा सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.

डॅडी उर्फ अरुमुगम हे सहावीत असताना शाळा सोडली. त्यावेळी ते वेलदोड्याच्या शेतात काम करायचे. त्यानंतर एका हॉटेलात कारागीर म्हणून काम करण्यास सुरवात केली. या ठिकाणी कामास असणाऱ्या सुपम्मा कडून जेवण बनवण्यास शिकले. त्यानंतर डॅडी यांनी मामिया नावाचं दुकान चालू केले. परंतु गोपीनाथ या त्यांच्या मुलाच्या कल्पनेमुळे डॅडीच आयुष्य बदलुन गेले. डॅडी यांनी पुन्हा स्वयंपाक करण्यास सुरवात केली. हळूहळू या जेवण बनविण्याचे व्हिडीओ तयार करण्यात आले. व्हिलेज फूड फॅक्टरी नावाने युट्युब चॅनल ओपन करण्यात येऊन त्याद्वारे लोकांपर्यंत पोंहचले. कालांतराने अरुमुगम यांच्या स्वयंपाकाच्या व्हिडिओंला चांगली प्रसिद्धी मिळायला लागली. आज या चॅनेलचे असंख्य फोल्लोवर्स आहेत.

आता ते चांगल्याप्रकारे वेज आणि नॉनव्हेज जेवण बनवतात. डॅडी सांगतात कि हे सर्व एक रात्रीत घडलं नसून यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. यासाठी कोलकत्ता, मुंबई या ठिकणी अनेक कामे केली आहेत. पारंपारिक आणि घरगुती जेवणाची चव टिकवण्यासाठी ते स्वयंपाक करण्यासाठी फक्त सरपण वापरतात गोपीनाथचे उत्पन्न अ‍ॅडसेन्स सेवा जो भागीदार वेबसाइट आणि यू ट्यूब चॅनेलवर जाहिराती प्रदर्शित करते. सामग्री आणि अभ्यागतांच्या प्रोफाइलवर आधारित जाहिराती देते आणि प्रकाशकाला देय जाहिरातींवरील दृश्यांच्या संख्येवर आणि क्लिकवर आधारित आहे. गोपीनाथ यांना दरमहा लाखो रुपये मिळतात.

अरुमूगम त्यांनी शिजवलेल्या तळलेल्या मटण लेग पीसचा आनंद घेत असतात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कमाईमुळेच गोपीनाथ हे आनंदी आहेत. गोपीनाथ म्हणतात आमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक कमेंटस करतात त्यांचा अभिप्राय देतात आणि त्यांना जास्त खाऊ नये आणि आरोग्याची काळजी घ्या असा सल्ला ही देतात. हे व्हिडिओ गोपीनाथ शूट करतात तर एडिटिंग त्याचे बंधू करीत असतात.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!