Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

आनंद शिंदे यांचा राजकारणात सूर; सोलापूरमधून निवडणूक लढविण्याची शक्यता

Share

मुंबई : गायक आनंद शिंदे यांनी राजकारणात प्रवेश केला असून आगामी विधासनसभेत सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षात सहभाग घेतला असून पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी देखील स्वीकारली आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मनोज संसारे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

दरम्यान आनंद शिंदे यांना यापूर्वीच अनेक पक्षांकडून ऑफर्स मिळाल्या होत्या परंतु सर्वाना नकार मिळाला होता. परिणामी आज सोलापूर मध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षप्रवेश करत असल्याची माहिती मिळाली.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ व सोलापूर शहर मध्य हे मतदारसंघ राखीव आहेत. या दोन मतदारसंघापैकी एका मतदारसंघातून आनंद शिंदे हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!