Type to search

Breaking News मुख्य बातम्या हिट-चाट

#HappyBirthdaySrbachhan : बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांचा आज जन्मदिन

Share

नाशिक : हिंदी बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते तसेच बीगबी, शहेनशाह यासारख्या विविध उपाध्यांनी लाखो चाहत्यांच्या मनात आणि हृदयात अधिराज्य करणारे महान अभिनेते अमिताभ बच्चन आज आपला ७८ वा जन्मदिवस साजरा करत आहेत.

प्रारंभीचे आयुष्य : अमिताभ बच्चन यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९४२ अलाहाबाद येथे एका हिंदू कुटूंबात झाला. त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील एक महान कवी होते. तर आई फेझलाबाद येथील होत्या. वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असे होते. अमिताभ यांचे शालेय शिक्षण ज्ञानप्रबोधिनी व बॉईज हायस्कुलमध्ये झाले. त्यांनी नैनितालमधील शेरवाड महाविद्यालयात आपले कला शाखेतील शिक्षण पूर्ण केले.

दिल्लीतील विद्यापीठातून किरोडीमल महाविद्यालयातून त्यांनी विज्ञान शाखेतील पदवी संपादन केली. आज त्यांच्या जन्मदिनाचे अभिनंदन करण्यासाठी लाखो चात्यांनी फेसबुक आणि ट्विटर यासारख्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवर शुभेच्छांचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे.

१९७० मध्ये त्यांची अँग्री यंगम्यान अशी ओळख होती पण आतापर्यंत त्यांनी १८० चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिकांमधून चाहत्यांच्या हृदयात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. भारतीय चित्रपटात अत्यंत महान अभिनेते म्हणून ते आजही प्रसिद्ध आहेत. आजवर आपल्या कारकिर्दीत त्यांनी ४ राष्ट्रीय आणि १४ फिल्मफेअर पुरस्कार पटकावले आहेत. १९८४-१९८७ मध्ये त्यांची लोकसभेसाठी निवाडा करण्यात आली होती. चित्रपट अभिनयाव्यतिरिक्त ते पार्श्वगायक , चित्रपट निर्माते आणि दूरदर्शन मालिकांचे निर्माते म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

कभी ख़ुशी कभी गम , दिवार , त्रिशूल , नामाखहलाल , डॉन , त्रिशूल , मुकद्दर का सिकंदर हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे होत. १९७० मध्ये सात हिंदुस्तानी या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटात अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

सलिल परांजपे देशदूत नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!