Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

अजित पवार यांचे ट्विटर हॅण्डल भाजप आयटी सेलच्या हाती? एका तासांत २२ ट्विट

Share

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक भाजपच्या दिग्गज नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यानंतर सायंकाळी सहा वाजेनंतर अजित पवार यांनी तासाभरातच २१ते २२ ट्विट करत सर्वांना धन्यवाद दिले. यावरून अजित पवार यांचे ट्विटर हॅण्डल भाजपच्या आयटी सेलच्या हाती असल्याची चर्चा राज्यभरात सुरु आहे

दरम्यान शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचं सरकार राज्यात येणार असं वाटत असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपबरोबर सत्ता स्थापन केली. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सह अमित शहा , नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, अमृता फडणवीस यांनी अजित पवार यांच्या ट्विटर हांडावर शुभेच्छा दिल्या.

यानंतर २२ नोव्हेंबर नंतर बंद पडलेले ट्विटर हॅण्डल अचानक चालू झाले. यावेळी एका तासाभरातच २१ ते २२ ट्विट पोस्ट करण्यात आले. तसेच २२ नोव्हेंबर पर्यंत ट्विटर हॅण्डल आयफोन वरून वापरण्यात येत होते. त्यानंतर वेब अँप वरून येऊ ट्विटर हॅण्डल वापरण्यात आले. त्यामुळे अजित पवार यांचे ट्विटर हॅण्डल भाजप आयटी सेलच्या हाती असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!