Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

शरद पवारांचा ‘पॉवर गेम’ फळाला; अजित पवारांचे ‘कहो दिलसे राष्ट्रवादी फिरसे’

Share

मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या सकाळच्या निकालानंतर वेगळेच वळण प्राप्त झाले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाचा राजीमा दिला आहे. या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला असून, शरद पवार यांच्या मानधरणीला यश मिळाले असल्याची चर्चा केली जात आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा बहुमताचा दावा फोल ठरू शकतो. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मुदतीच्या आधीच अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे राज्यातील राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. शनिवार पासून अजित पवार यांनी पक्षात पुन्हा यावे यासाठी मनधरणी चालू होती. त्या मानधरणीला यश मिळाल्याचे दिसून येत आहे.

अजित पवार यांच्या भाजपासोबत जाण्याने कुटुंबियांमध्ये फूट पडल्याचे वृत्त होते. त्यानंतर पवार कुटुंबियामधील अनेकांनी ‘दादा परत या’ अशी साद घातली होती. त्यामुळे शरद पवार, पवार कुटुंबीय व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रयत्नांना यश आले असून आता राज्यातील राजकरण काय वळण घेतंय याकडे सर्वच लक्ष लागून आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!