Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

शपथविधीनंतर अजित पवारांचं पहिलं ट्विट…मानले ‘यांचे’ आभार; ट्विटर प्रोफाइलही बदललं

Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार अजित यांनी शनिवारी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या सत्ता नाट्यानंतर पहिल्यांदाच अजित पवारांनी ट्विट करत नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरु असलेल्या सत्ता नाट्याला काळ सकाळ नंतर वेगळेच वळण मिळाले. अजित पवार यांनी राज्यपालासमोर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. परंतु अजित पवार कालपासून संपर्कात नव्हते.

परंतु आता थोड्यावेळापूर्वी अजित पवार यांनी नरेंद्र मोदींच्या ट्विटला रिट्विट करत धन्यवाद दिले आहेत. त्यानंतर अमित शहा , नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी यांनाही धन्यवाद दिले आहेत. त्यामुळे आता अजित पवार हे काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज सकाळची झालेल्या सुनावणीनंतर उद्या पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी असून अजित पवार यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!