Type to search

Breaking News maharashtra नाशिक मुख्य बातम्या

आम्हालाही भावना आहेत, साहेबांना त्रास झाल्याने राजीनाम्याचा निर्णय : अजित पवार

Share

नाशिक : ‘महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत जो घोटाळा झाला, आणि जे गुन्हे दाखल झाले त्यामुळे अस्वस्थ होतो, तसेच या प्रकरणामुळे साहेबाना नाहक त्रास सहन करावा लागला त्यामुळे राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यांच्या राजीनाम्याचे गुपित अखेर उलगडले आहे.

ते पत्रकार परिषदेत बोलता होते. यावेळी ते म्हणाले कि, माझ्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून राजीनामा दिला. माझ्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला तसेच अनेकांची मने दुखावली त्यांची मी माफी मागतो. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत जो घोटाळा झाला, त्यामुळे मी अस्वस्थ झाल्याने हा राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे.’

ते पुढे म्हणाले कि, राजकीय क्षेत्रात काम करतांना आम्ही पण माणसं आहोत, आम्हालाही काही भावना आहेत की नाही असे म्हणत अजित पवार झाले भावूक आमचे सहकारी आमच्यातून निघून गेले, त्याच वाईट वाटलं. आम्ही कमी पडलो असं आम्हाला वाटलं, जे गेले तो त्यांचा स्वतःचा निर्णय होता. तसेच ज्या साहेबांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे, आज मला साहेबांनी ओळख दिली मात्र घोटाळ्यात साहेबांचे नाव आल्याने मी अस्वस्थ होतो यामुळे आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल शरद पवार आणि ईडी हे दोन विषय चर्चेचे होते, तर संध्याकाळी उशिरा अचानक अजित पवार यांनी आपला आमदारकीचा राजीनामा दिला. अजित पवार यांच्या या तडकाफडकी निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या सर्व प्रकरणावर सिल्वर ओक येथे बैठक पार पडल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा नाट्य उलगडले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!