मुंबई : विमानतळावरून 24 तासांत 969 विमानांचे टेक ऑफ/ लंडिंग

0

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शुक्रवारी 24 तासांत 969 विमानांनी टेक ऑफ आणि लँडिंग केल्यामुळे विमानतळाने स्वतःच्या नावे नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

मुंबई विमानतळाच्या रनवेवरून याआधी 935 टेक ऑफ आणि लँडिंग यशस्वीपणे पार पाडले होते.

ही माहिती छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्यांनी सांगितली आहे.

तांत्रिकदृष्टय़ा विचार केल्यास मुंबई विमानतळवर एकच रनवे उपलब्ध असल्यामुळे एकाच रनवेवरून अनेक विमानांना उड्डाण व लँडिंग करावे लागते.

जवळपास 900 पेक्षा अधिक विमानांची मुंबईत दररोज ये-जा होत असते.

टेक ऑफ आणि लँडिंगच्या बाबतीत लवकरच मुंबई विमानतळ 1000 चा आकडा ओलांडेल, असे वक्तव्य एमआयएएलच्या अधिका-यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*