डिसेंबर २०१९ पर्यंत राज्यभर ५७ हजार सौरकृषिपंप

0

मुंबई : महावितरणकडून राज्यभर ५७००० सौरकृषिपंप लावण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना स्वस्तात वीज मिळावी यासाठी हा प्रकल्प असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. मोहिमेला प्रतिसाद मिळावा म्हणून शेतकऱ्यांना सौरकृषिपंप लावण्याचे फायदे सांगण्यात येतील. डिसेंबर २०१९ पर्यंत २ लाख कृषिपंप तर ५ लाख २८ हजार शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्याचे ठरविले आहे.

सौरकृषिपंप योजनेंतर्गत राज्यात आतापर्यंत ७ हजार ५०० कृषिपंप लावण्यात आले आहेत. तर केंद्राच्या अटल सौरकृषिपंप योजनेंतर्गत सुमारे ७ हजार ५०० सौरकृषिपंप केंद्राकडून मिळाले आहेत. महावितरणही सुमारे ५० हजार सौरकृषिपंप लवकरच खरेदी करणार आहे. त्यामुळे राज्यात लवकरच ५७ हजार सौरकृषिपंप लावण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. महावितरण सौरकृषिपंपासाठी आग्रही आहे.

मात्र, बरेचदा शेतकऱ्यांकडून याला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शेतांमध्ये सौरकृषिपंप लावण्याचे लक्ष्य गाठण्यात अपयश आले असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मात्र, शेतकऱ्यांना सौरकृषिपंपांचे महत्त्व पटवून देण्यासाठी महावितरणकडून त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*