Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

आदित्य ठाकरेंनी घेतली आमदारकीची शपथ; ‘हे’ तरुण आमदार गाजवणार विधानसभा

Share

मुंबई : ठाकरे कुटंबातील पहिला विधानसभा आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांनी शपथ घेतली असून यंदाच्या विधानसभेत सर्वाधिक तरुण आमदार असणार आहेत.

दरम्यान सत्ता स्थापनेचा तिढा कजर सुटला असून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार लवकरच स्थापन होणार आहे. या निमित्ताने आज सकाळपासुन विधानभवनात तिन्ही पक्षांच्या आमदारांना राज्यपालांनी शपथ दिली. यावेळी ठाकरे घराण्यातील पहिला ठाकरे म्हणून विधानसभेचा सदस्यांची शपथ घेण्याचा मान आदित्य ठाकरे यांना मिळाला आहे. आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहे.

त्यानंतर या सरकारमध्ये सर्वाधिक तरुण आमदार विधानसभा गाजवणार आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे, कोल्हापूरचे कॉंग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील, राष्ट्रवादीचे रोहित पवार, काँग्रेसचे झिशान सिद्दीकी, नमिता मुंदडा, प्रणिती शिंदे, आदिती तटकरे, अमित देशमुख हे आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!