Type to search

Breaking News मुख्य बातम्या हिट-चाट

तेजस्वीनी पंडितचा प्रश्न मांडणारा आदिशक्ती अवतार पाहिलात का?

Share

मुंबई : मुंबईतील आरे मेट्रो कारशेड प्रकरणी अंधारात झाडे कापण्याचा प्रकार समोर आला. यानंतर राज्यभरातून पर्यावरणप्रेमींनी यास विरोध केला. तसेच अनेक सेलिब्रिटींनी देखील आरे बचाव मोहिमेत सहभागी होत या घटनेचा तीव्र निषेध केला . यावेळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने देखील एका अनोख्या पद्धतीने आरे वाचवा मोहिमेत सहभागी होत सरकारला विचार करण्यास भाग पाडले.

 

View this post on Instagram

 

अष्टमी “गावदेवी” . . थांब घाव घालू नकोस……याच्या मुळावर घालू नकोस ….समस्येच्या मुळावर घाल…. इतके रस्ते इतकी वाहन असूनही तुला ‘वेग’ कमीच वाटतोय का? तुझा प्रवास सुखकर आणि वेगाने होण्यासाठी तू आज यांचा प्रवास संपवतोयस? किती हतबल आहे मी…..या संपत्तीला कसे वाचवू? किती जीव वैविध्याने सजवली होती मी हि वसुंधरा …यावर हक्क फक्त तुमचाच कधी झाला? ….जंगलं साफ करा वस्त्या वाढवा….रस्ते बनवा…सोय फक्त स्वत:चीच बघा ….इतरांचे काय? ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हे फक्त शोभेसाठीच न? Carbon dioxide कमी करणार असे सांगून स्वत: ची समजूत काढतोयेस का? मग निसर्गाने हे हिरवे नवल का रचले ? ते फक्त Carbon dioxide कमी करत नाहीत तर तुला ‘प्राणवायूचे’ वरदानही देतात…. अनेकांचा आश्रय आज निर्दयतेने कापून काढला जातोय….तुमचा प्रवास सोपा व्हावा म्हणून तुम्ही कुणाचा तरी प्रवास संपवत आहात. लक्षात ठेवा हा प्रवास आज त्यांचा संपतोय आणि कालांतराने तुमचा देखील…. . . Concept & Director : @dhairya_insta_ Photographer : @bharatpawarphotography Digital art by : @amol.hirawadekar @imvishalshinde @thenameisabhishekk Asst. Dir : @shraddha_kakade Jewellery by : @pngadgilandsons Makeup : @vinodsarode Hair : @sheetalpalsande Styled by : @stylistnakshu @saniyacool @pottering.vels Costumes By : @official_dadfashionstudio PR & Social Media By : @dreamers_pr Special thanks @jyotsnapethkar and @rjadhishh #aarey #saveaarey #gaodevi #navratri #tejaswinipandit

A post shared by Tejaswini Pandit (@tejaswini_pandit) on

सध्या सर्वत्र नवरात्रीचे वातावरण दिसून येत आहे. नवरात्री म्हणजेच अर्थातच देवीची आराधना करण्याचे मंगलमय नऊ दिवस असे मानले जाते. या पार्श्वभूमीवर तेजस्विनी पंडितने राज्यातील अनेक समस्या या संक्लपनेतून मांडल्या असून या देवीची विविध रूपही यातून पाहावयास मिळत आहे.

दरम्यान, अभिनेत्री ‘तेजस्वीनी पंडीत’ हिने सोशल मीडियावर आधार घेत काही पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील आरे प्रकरण, जीएसटी, रस्त्याचा पप्रश्न , नदी प्रदूषण, महापूर आदी बाबी या माध्यमातून मांडण्यात आल्या आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!