अभिनय सोडून नर्स झाली अभिनेत्री, कोरोनाग्रस्तांची करतेय सेवा

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई – 

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. एवढंच नाही तर अनेक कलाकार, सेलिब्रिटी या कठीण काळात मदतीचा हात पुढे करत आहेत.

अनेकांनी आपआपल्या राज्यांमध्ये आर्थिक मदत केली आहे. याशिवाय ते आपल्या चाहत्यांना घरात राहण्याचं आवाहनही वेळोवेळी करत आहेत.

पण या सगळ्यात असेही काही कलाकार आहेत जे थेट रुग्णांच्या सेवेसाठी पुढे आले आहेत. यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री शिखा मल्होत्रा.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच असून याला रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जनतेने घरात राहणं. याचसाठी सरकारने देशात लॉकडाउन घोषित केलं.

या सगळ्यात डॉक्टर, नर्स, पोलीस आणि सरकारी कर्मचारी जे अत्यावश्यक सेवांमध्ये मोडतात त्यांना मात्र घराच्या बाहेर पडणं आवश्यक आहे.

करोनाग्रस्तांवरील उपचारांसाठी डॉक्टर आणि नर्स दिवस रात्र काम करत आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांना जागरुक जनतेने घरात राहून सहकार्य करावं एवढी त्यांची माफक अपेक्षा आहे.

दरम्यान, कांचली सिनेमाची अभिनेत्री शिखा मल्होत्रानेही अनोख्या पद्धतीने मदतीचा हात पुढे केला आहे. शिखाने करोना व्हायरस पीडितांची सेवा करण्याचं ठरवलं आहे.

बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या मदतीने ती करोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज आणि नवी दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटल मधून तिने नर्सिंगचा कोर्स केला होता.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *