आधारकार्डवरील माहिती हॅक झाली तर ?

0

मुंबई : भारतातील प्रत्येक व्यक्तीची ओळख म्हणजे आधारकार्ड होय. आजही मोठ्या प्रमाणावर आधार कार्डच्या संरक्षणासंदर्भात भारतामध्ये वाद चालू आहे. नुकताच युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी (यूआयडीएआय) ने आधारकार्डसाठी फेस रिकॉग्निशन करण्यासाठीचे संशोधन सुरु आहे, परंतु एका अहवाल दरम्यान असे लक्षात आले कि, हि माहिती हॅक होत असून सुरक्षेच्या दृष्टीने हानीकारक आहे.

हफिंगटनपोस्ट डॉट इन ने आपल्या अहवाल सांगितले आहे कि, देशातील सुमारे एक अब्ज लोकांची वैयक्तिक माहिती उघडकीस होण्याच्या मार्गावर आहे. अहवालानुसार असे स्पष्ट करण्यात आपले कि, या सॉफ्टवेअर मध्ये बिघाड करण्यात आला असून याद्वारेदेशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून एखादी व्यक्ती कोणाच्याही नावाने आधारकार्ड बनवू शकते.

या सॉफ्टवेअरची किंमत केवळ 2500 रुपये आहे. हफिंग्टन पोस्ट डॉट ने दावा केला आहे की त्याने तीन महिन्यांच्या चौकशीनंतर हा अहवाल प्रकाशित केला आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी जगभरातील 5 तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की या सॉफ्टवेअरचा वापर झपाट्याने होत आहे. त्यामुळे या सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रमाणित आधारकार्ड बंद केले जाऊ शकते आणि त्याठिकाणी नवीन आधारकार्ड बनवले जात आहे.

LEAVE A REPLY

*