Type to search

Breaking News टेक्नोदूत मुख्य बातम्या

महिलांच्या सुरक्षेकरिता उपयोगी मोबाइल अ‍ॅप

Share

मुंबई : दिवसेंदिवस महिलांच्या असुरक्षिततेत वाढ होत आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणा देखील विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिला सुरक्षेवर प्रकाश टाकत असते. तसेच उपाययोजना राबवून महिलांना सुरक्षितता प्रदान करत असते. याच प्रमाणे सोशल मीडियात महिला सुरक्षेसाठी काही ऍपची निर्मिती करण्यात आली आहे.

जळगाव हेल्पलाईन ऍप

दरम्यान जळगाव येथील पोलीस विभागाने महिला सुरक्षेसाठी हेल्पलाईन ऍपची निर्मिती केली आहे. महिलांच्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी तसेच सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हे ऍप तयार केले आहे. सायबर गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने सायबर सेल आणि खाजगी सॉफ्टवेअर उद्योग समूहाच्या सहकार्याने मदतीने नवीन सोशल मीडिया सेंटर तयार करण्यात आले आहे.महिला अत्याचाराच्या घटना आणि ज्येष्ठ नागरिकांना या ऍपची मदत हाेणार आहे.

रेल्वे सुरक्षा बला’चे‘आयवॉच विमेन’ ऍप
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष लक्ष देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यासाठी एम-इंडिकेटरवरच रेल्वे पोलिसांचा (आरपीएफ) हेल्पलाइन नंबर देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.  एम-इंडिकेटरवर पश्चिम आणि मध्य रेल्वेचा हेल्पलाइन नंबर देण्यात आला असून यात आपत्कालीन परिस्थितीसाठी एसएमएस सेवाही उपलब्ध करण्यात आली आहे. एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नातेवाइकांनाही एसएमएस जावा आणि त्यांनाही संपर्क साधता येण्यासाठी यामध्ये दोन नातेवाइकांचे नंबर उपलब्ध करून देण्याची सोयही करण्यात आली आहे.

‘कहा हो’ ऍप

हे ऍप चंदिगढ मध्ये लॉन्च करण्यात आले असून आयोएस आणि अँड्राॅइड फोनसाठी उपलब्ध आहेत. तसेच लहान मुलीपासून ते वृद्ध महिलेपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित हाताळता येईल , अशा पद्धतीने बनविण्यात आले आहे.

प्रा. योगेश हांडगे 

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!