Type to search

Breaking News टेक्नोदूत मार्केट बझ मुख्य बातम्या

ऑनलाईन खरेदी करत असाल तर ‘या’ दहा गोष्टी जाणून घ्या

Share

नवी दिल्ली : जर तुम्ही या महिन्यात ई-कॉमर्स वेबसाइटवर खरेदी करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी चांगला असणार आहे. या वेबसाईट या महिन्यात बाजारात मेगा विक्रीचे आयोजन करणार असून यामुळे ग्राहकांना अमेझॉन, फ्लिपकार्टवर भरगोस सूट मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान अमेझॉन, फ्लिपकार्ट लवकरच या मेगा सेल चे आयोजन करत असून यामध्ये स्मार्टफोन घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना खास ऑफर मिळणार आहे. कारण या मेगासेलमध्ये स्मार्टफोनची विक्री अधिक करण्यात येणार आहे. जर तुम्हालाही ई-कॉमर्स वेबसाइटवरून स्मार्टफोन घ्यायचा असेल तर त्यापूर्वी नक्कीच या गोष्टींकडे लक्ष द्या.

  • खरेदी करण्यापूर्वी आपण एकापेक्षा जास्त वेबसाइट तपासणे आवश्यक आहे. बाजारात ईकॉमर्सच्या अनेक वेबसाइट्स आहेत. ज्या वेगवेगळ्या किंमतींवर उत्पादन विकत असतात. त्यामुळे या वेबसाईटवर उत्पादनांच्या किंमती तपासल्या पाहिजेत.
  • तसेच उत्पादनाच्या रेटिंग आणि रिव्हिव्ह तपासल्यानंतर आपल्या लक्षात येते कि आपण खरेदी करत असलेले उत्पादन योग्य आहे कि नाही.
  • खरेदी करत असलेल्या उत्पादनाची वैधता तपासणे गरजेचे असते. यामुळे उत्पादनात काही बिघाड झाल्यास आपल्याला संपर्क करता येईल.
  • एका उत्पादनासाठी अनेक ऑफर्स असतात. त्यामुळे असे होत कि, काहीवेळा तुम्ही चुकीची ऑफर निवडता. त्यामुळे खरेदी करताना ऑफर चेक करत चला.
  • उत्पादन खरेदी करण्यापूर्वी उत्पादनाची डिलिव्हरीची वेळ तपासून घेणे. अशावेळी उत्पादन योग्य वेळी मिळाले नाही तर समस्यांचा सामना करावा लागतो.
  • उत्पादनाची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. काहीवेळा उत्पादनाची माहिती चुकीची मिळू शकते.
  • तसेच एक्सचेंज ऑफर देखील महत्वाची ठरते. त्यामुळे खरेदी करत असलेले उत्पादन कमी दरात मिळण्याची शक्यता तयार होते.
  • रिव्यू आणि विक्री नंतरची सेवा या दोन्ही गोष्टीवर लक्ष द्यायला हवे. रिव्यू वाचल्यानंतर आपल्याला उत्पादनासंदर्भात अधिक माहिती मिळते.
  • उत्पादन खरेदी वेळी परतावा धोरण (रिफंड- रिटर्न पॉलिसी) महत्वाची असते. कारण एखादे उत्पादन खराब निघाले तर रिटर्न करता येणे आवश्यक आहे.
  • काही ईकॉमर्स वेबसाईटवर सेल लागल्यानंतर काहीवेळा जुन्या फोनची विक्री या सेलमधून केली जाते. अशावेळी काळजी घेणे आवश्यक आहे.
Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!