मुळा नदीत 6 हजार क्युसेकने पाणी : नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा

0
राहुरी (प्रतिनिधी) – चित्रा नक्षत्रातील परतीच्या पावसाने मुळा धरणाच्या पाणलोटात व लाभक्षेत्रात दमदार हजेरी लावली. पाणलोटातील तुफानी पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणात आवक वाढली आहे. त्यामुळे धरणाच्या संपूर्ण 11 मोर्‍यांमधून काल बुधवारी (दि. 11) सकाळी 3 वाजता सुमारे 4 हजार क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.
रात्री 8 वाजता विसर्ग 6 हजार करण्यात आला. शाखाभियंता शामराव बुधवंत यांनी कळ दाबून धरणाचे दरवाजे उघडताच धरणातील पाणी वेगाने मुळा नदीपात्रात झेपावले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बुधवारी सकाळी धरणात 1 हजार 393 क्युसेकने आवक सुरू होती.
मात्र, सायंकाळनंतर पाणलोटात दमदार पाऊस झाल्याने धरणात आवक वाढून ती 1 हजार 513 वर गेली आहे. दरम्यान, मुळा नदीकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून रात्री केव्हाही आवक वाढण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*