Type to search

Featured सार्वमत

‘मुळा’च्या मळ्याची मळमळ!

Share

इनामी जमीन संगनमताने लाटली । नवनाथ दळवी यांचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी) – वन जमिनीवरून चर्चेत आलेली सोनईची मुळा एज्युकेशन सोसायटी नगरमधील जमिनीने पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाली आहे. जमीन मालकाच्या मृत्युनंतर दोन वर्षानी कुलमुखत्यारपत्र तयार करून वडगाव गुप्ता येथील मळा संगनमताने लाटल्याचा आरोप सावेडीतील नवनाथ शंकर दळवी यांनी केला आहे. तशी तक्रार त्यांनी कलेक्टर आणि एसपींकडे केली आहे. तेवीस वर्षांनंतर उद्भवलेल्या या आरोपांकडे वेगळ्या नजरेने बघितले जात आहे.

वडगाव गुप्ता येथील 166/2/2 सर्व्हे नंबरमध्ये अब्दुल करीम सय्यद आणि चाँदबी फकीर महंमद यांची जमीन आहे. पुण्यातील नंदकुमार गोपाळराव कुलकर्णी आणि नगरचे प्रमोद चंद्रकांत मोहोळे यांनी संगनमताने 1997 बेकायदेशीरपणे त्यांचे कुलमुखत्यारपत्र दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविले. त्यावर साक्षीदार म्हणून ज्ञानदेव भाऊराव शेरकर (रा. माळीवाडा) आणि प्रकाश विठ्ठल साळुंके यांची नावे आहेत. चाँदबी फकीर महंमद यांचे जानेवारी 1995 मध्ये निधन झाले. असे असतानाही मृत्युनंतर दोन वर्षानी नोंदविलेले मुखत्यारपत्र हे बनावट व्यक्ती उभी करून नोंदविल्याचा आरोप दळवी यांनी केला आहे. याच कुलमुखत्यारपत्राच्या आधारे कुलकर्णी व मोहोळे यांनी ही जमीन मुळा एज्युकेशन सोसायटीला विकली. बेकायदेशीर दस्ताच्या आधारे झालेला हा व्यवहार बेकायदा असून चाँदबी यांच्या वारसांची फसवणूक झालेली आहे. या गंभीर स्वरुपाच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी दळवी यांनी केली आहे.

मशीद देव इनाम जमीन
ही जमीन मशीद देव इनाम वर्ग 3 ची होती. दस्तामध्ये फेरफार करून इनाम वर्ग 3 कमी करण्याचे आदेश झाले. 7/12 वर नोंदविलेले फेरफार पाहता अनागोदी होऊन शासनाची व व्यक्तीची फसवणूक झाली आहे. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी दळवी यांनी केली आहे. कुलकर्णी, मोहोळे आणि मुळा एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी संगनमताने कटकारस्थान करून कुलमुखत्यारपत्र नोंदविले असल्याचा दळवी यांचा आरोप आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!