Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कालव्याचे काम युध्दपातळीवर सुरू

Share

आजपासून आवर्तन पूर्ववत होण्याची शक्यता, मात्र करपरा नदीला पाणी सुटणार नाही

उंबरे (वार्ताहर)- उंबरे येथील पेटीपुलाशेजारी मुळा उजवा कालव्याला पडलेले भगदाड बुजविण्याचे काम काल सोमवारी युध्दपातळीवर सुरू आहे. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी ठाण मांडून होते. त्यामुळे काम जवळपास पूर्ण होत आले असून आज मंगळवार दि.20 ऑगस्ट रोजी सांयकाळपर्यंत पुन्हा कालव्याला आवर्तन सोडणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मोरे यांनी दिली. त्यामुळे राहुरी, नेवासा, शेवगाव आणि पाथर्डीतील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

उंबरे उजवा कालव्याला पेटीपूला शेजारी असणारे ससे गांधले लिप्ट च्या सिमेंटी नळ्यामध्ये काही विघ्नसंतुष्ट लोकांनी या नळ्यात स्फोट घडवून आणल्याने त्या नळ्या आतून फुटल्या होत्या. त्यामुळे मोठे भगदाड पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गेले. कालवा बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. याबाबतचे वृत्त दै. सार्वमतमध्ये बातमी प्रसिद्ध होताच मुळा उजवा कालवा पाटबंधार्‍याचे कार्यकारी अभियंता मोरे तसेच अभियंता पद्मसिंह तनपुरे, उपअभियंता सायली पाटील हे सकाळी 8 वाजल्यापासून घटनास्थळी ठाण मांडून होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भगदाड बुजविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू होते. कालव्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे आजपासून आवर्तन पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याठिकाणी हे लिप्टची सिमेंटची नळी क्रॉक्रेटने पूर्ण बंद केल्यामुळे आता मात्र उंबरे करपरा नदीला पाणी सुटणार नाही त्यामुळे शेतकर्‍यांपुढे पाणी संकट उभे राहणार आहे. त्यामुळे आ. शिवाजी कर्डिले यांनी पुढाकार घेऊन करपरा नदीला पाणी सोडण्याची व्यवस्था करावी अन्यथा शेतकरी उजाड झाल्या शिवाय राहणार नाही. तर शेतकर्‍यांना रस्त्यावर उतारल्या शिवाय पर्याय नाही. त्यामुळे याबाबत त्वरीत उपाय शोधावा अशी मागणी होत आहे.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!